
धाराशिव जिल्ह्यात आज कोरोनाचे तीन रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 7 वर गेली आहे. आज धाराशिव जिल्ह्यातील 28 संशयिताचे अहवाल तपासणीसाठी लातूर येथील विलासराव देशमुख विज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी 25 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह तर उर्वरित 3 रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये कळंब तालुक्यातील हावरगांव येथील 2 महिला तर भूम तालुक्यातील पन्हाळवाडी एका एका तरुणाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या तिन्ही व्यक्ती या मुंबई येथे काम – धंद्यासाठी गेल्या होत्या. परंतु सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्यामुळे ते आपल्या गावी परत आले आहेत.
आज जिल्ह्यात तीन रुग्ण आढळल्याने आता जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 7 वर गेली आहे. यापुर्वी परंडा येथे एक आणि कळंब येथे 3 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7 वर गेली आहे.






























































