
सामना ऑनलाईन । सातारा
साताऱ्यात चालकाचा ताबा सुटल्याने जीप पाण्यात उलटून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार वर्षाच्या एक मुलगा व नऊ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. लोणंद-नीरा रस्यावर पाडेगाव (ता.खंडाळा) गावच्या हद्दीत जीप नीरा उजव्या कालव्यात वाहात्या पाण्यात पडल्याने हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बल्लाळ व साळुंखे कुटुंबिय भाग्यश्री टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स जीप मधून मुंबईला निघाले होते. लोणंद नजीकच्या एका धाब्यावर थांबून त्यांनी जेवण केलं. त्यावेळी महेश बल्लाळ यांनी मद्य प्राशन केले. त्याच अवस्थेत ते गाडी चालवू लागला. दरम्यान, त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी नीरा उजव्या कालव्यात वाहात्या पाण्यात पडून हा अपघात झाला. या अपघातात महेश जगन्नाथ बल्लाळ (२६), दाद गोरख बल्लाळ (४) आणि सृष्टी संतोष साळुंखे (९) यांचा मृत्यू झाला आहे तर संतोष दादासो साळुंखे (३४), गोरख सुरेश बल्लाळ ( ३३), अंविता संतोष साळुंखे (३३), सुजल संतोष साळुंखे ( १२) उज्वला गोऱख बल्लाळ ( २६) हे जखमी झाले आहेत.



























































