खारघर, नेरळमध्ये तीन तरुण बुडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाचा आनंद लुटत असताना तीन तरुण बुडाल्याच्या वेगवेगळ्या घटना खारघर आणि नेरळमध्ये आज घडल्या. खारघरमधील पांडवकडा धबधब्यात बुडालेल्या दोन तरुणांचा शोध अद्यापपर्यंत लागलेला नाही. नेरळ परिसरातील टपालवाडी धबधब्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बचाव पथकाने पाण्यातून बाहेर काढला असून या तरुणाचे नाव आरबीन्यूदीन शेख असे आहे.

खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर जाण्यास प्रशासनाने बंदी केली आहे. मात्र बंदी आदेश झुगारून तळोजा येथील मोहम्मद आणि सांताक्रुझ कोळीवाडा येथील शेण्णोन किनी हे दोघे पावसाचा आनंद लुटण्यासाठी या धबधब्यावर आले होत.