इराणमधून तीन हिंदुस्थानी बेपत्ता

इराणमध्ये गेलेले तीन हिंदुस्थानी नागरिक बेपत्ता झाले आहेत. या तिन्ही नागरिकांचा शोध लागेना झाला आहे. बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय दूतावासाने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांनी भारतीय दूतावासांशी संपर्क करून त्यांना बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर दूतावासाने इराणी सरकारशी संपर्क साधून बेपत्ता नागरिकांना लवकर शोधण्याची विनंती केली आहे.