
मराठी जनतेच्या उठावापुढे झुकत महायुती सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचा आदेश मागे घेतला. त्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्रिभाषा सूत्राचा हेका कायम आहे.
आमच्याकरिता हा विषय प्रतिष्ठेचा नाही. पण एक निश्चित सांगतो, त्रिभाषा सूत्र हे महाराष्ट्रात लागू होईलच. पहिलीपासून की कधी ते कमिटी ठरवेल. शंभर टक्के आम्ही हे भाषा सूत्र लागू करणारच. इंग्रजीला पायघडय़ा आणि भारतीय भाषांचा विरोध करायचा हे योग्य नाही, असे फडणवीस म्हणाले.