उपराजधानी हादरली, नागपुरात चार तासांत तीन निर्घृण हत्या

605

राज्याच्या उपराजधानीत बुधवारी अवघ्या चार तासांत वेगवेगळय़ा पोलीस ठाण्यांअंतर्गत निर्घृण खुनाच्या तीन घटनांमुळे शहर हादरून गेले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. नागपूरच्या तीन वेगवेगळ्या भागांत तिघांची हत्या झाली. त्यामध्ये एक सामन्य भाजी विक्रेता, एक तरुण आणि एकाचा समावेश आहे.

पहिली घटना नंदनवन पोलीस ठाण्याअंतर्गत हसनबाग रोडवर घडली. भाजी विक्रीचा व्यवसाय करणारे मोहम्मद आसिफ शेख यांच्या ठेल्यावरून काही गुंडांनी भाजी खरेदी केली, मात्र पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी भाजी विक्रेता आसिफ आणि त्याचा मित्र इम्रान सय्यद नियाज याने भाजीचे पैसे मागितले, मात्र गुंडांनी पैसे देण्यास नकार देत उलट दोघांना मारहाण केली. त्यानंतर गुडांनी चाकूने भोसकून इम्रानची हत्या केली, तर आसिफ शेखला गंभीर जखमी केले.

दुसरी घटना नंदनवन पोलीस ठाण्याअंतर्गत सेनापती नगरच्या मैदानात घडली. या ठिकाणी विकी डहाके नावाच्या तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. या घटनेचे कारण अद्याप समजले नाही, मात्र पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

तिसरी घटना बैरामजी टाऊन परिसरातील गोंडवाना चौकात घडली. कूलरचा व्यवसाय करणाऱया ऋषी खोसला यांची हल्लेखोरांनी रस्त्यात अडवून हत्या केली. मध्यरात्रीच्या सुमारास ऋषी खोसला कारने घराकडे जात असताना काही हल्लेखोरांनी कार अडवून ऋषी यांना गाडीबाहेर ओढून काढले. त्यानंतर त्यांची धारदार शस्त्राने हत्या केली. या घटनांची गंभीर दखल घेऊन पोलीस प्रशासन हल्लेखोरांना पकडण्यासाठी कामाला लागले आहे, मात्र अशा घटनांमुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

22 दिवसांत खुनांच्या सहा घटना
पहिली घटना अजनीत घडली. ऑगस्ट महिन्यात हत्येच्या एकूण 6 घटना घडल्या. त्यात दानपेटीतील पैशाच्या वाटणीवरून अट्टल चोरटय़ांनी मित्राची हातपाय बांधून बेदम मारहाण करून दोरीने गळा आवळून हत्या केली. 9 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. साहिल प्रमोद तांबे (17) असे मृताचे तर सुमित पिंगळे, शुभम पुलझेले, दुर्गेश ढाकणे, पीयूष काळबांडे, बिसन बालाखाटी ऊर्फ बारीक, अक्षय व भुजया अशी आरोपींची नावे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या