बुलढाणा जिल्ह्यात 4 अहवाल कोरोना निगेटिव्ह; तर 3 पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलढाणा जिल्ह्यात रविवारी मिळालेल्या 7 रिपोर्ट पैकी 4 रिपोर्ट निगेटिव्ह असून 3 रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 685 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आता या तिघांसह एकूण 29 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 23 कोरोनाबाधीत रुग्णांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशाप्रकारे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 23 झाली आहे. सध्या रूग्णालयात 5 कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

रविवारी एकूण 7 अहवाल मिळाले. त्यातील तीन अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यामध्ये खामगाव येथील 60 वर्षीय महिला, शेगाव येथील 35 वर्षीय पुरुष आणि नरवेल, ता. मलकापूर येथील 7 वर्षीय मुलीचा समावेश आहे. तसेच अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले 68 नमुने आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली आहे.