परभणीच्या मानवतमधील खुनाचा गुन्ह्याचा उलगडा; आरोपींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणीतील मानवत तालुक्यात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची शनिवारी ओळख पटली असून त्या व्यक्तीची हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हत्या झालेला व्यक्ती पुणे येथील असून धारदार शस्त्राने त्याचा खून करणारे आरोपी मानवत तालुक्यातीलच असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

मानवत तालुक्यातील नागरजवळा येथे 24 फेब्रुवारीला पोलीस पाटील सुरेश श्यामराव देंडगे शेताशेजारी असलेल्या कॅनॉलमध्ये किती पाणी आहे, हे पाहण्यासाठी गेले असता तेथे एक मृतदेह त्यांना आढळला. तो मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. त्याच्या हातात ब्रेसलेट व खिशात बुलेट गाडीची चावी होती. मात्र, त्याची ओळख मात्र पटली नव्हती. त्यामुळे याप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी तपासात त्या व्यक्तीचा गळा कापून डोक्यावर जखम करून खून केल्याचे निष्पन्न झाले. ती व्यक्ती पुण्याची असून त्याचे नाव रोहिदास दशरथ बालवाडकर ( वय 55) आहे. खुनातील प्रमुख आरोपी विठ्ठल ज्ञानोबा काळे (रा. थार ता. मानवत ह.मु. बालेवाडी), नारायण धोंडीबा राठोड (रा. सारंगपूर ता. मानवत), या दोघांना पुणे येथील पोलिसांच्या एका पथकाने शुक्रवारी सायंकाळी अटक केली. तिसरा आरोपी महादेव चिंतामणी (रा. सारंगपूर ता. मानवत) याला पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पूर्णा येथून अटक केली.