जालन्यात 3 दरोडेखोरांना अटक; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

381

जालना शहर व जिल्ह्यात चेन स्नॅचिंग, जबरी चोरी, घरफोडी करणाऱ्या 3 दरोडेखोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. आरोपीमध्ये आकाश उर्फ चोख्या राजु शिंदे, सचिन बाबु गायकवाड, राम सखाराम निकाळजे यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून 140 ग्रॅम सोन्याचे दागिने, 25 हजार रोकड, 50 हजाराची हिरो एक्सट्रीम सीबी झेड मोटार सायकल असा एकूण 5 लाख 93 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

जालना जिल्ह्यात जबरी चोऱ्या करणारे 3 अट्टल दरोडेखोर जूना जालना, कैकाडी मोहल्ल्यात थांबले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ छापा टाकून तिन्ही दरोडेखोरांना अटक केली. तिघांनी बजरंग दालमिल, ब्राह्मणगल्ली, पिवळा बंगला परिसर, जालना-अंबड रोड, भाग्यनगर, समर्थनगर, कांचनगर, नवीन मोंढा आदी ठिकाणी चेन स्नॅचिंग, चोरी, घरफोड्या केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलिस अधिक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक दुर्गेश राजपुत, पोलीस हेड कॉन्स्टेबल सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, पोलीस नायक गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, विनोद वडदे, कृष्णा तंगे, सागर बावीस्कर, पोलीस कॉन्स्टेबल सचिन चौधरी, विलास चेके, रवी जाधव या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या