
बायकोशी असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध केल्याचा राग आल्यामुळे तिघांनी मिळून एका व्यक्तीला शिवीगाळ करून उलट्या कोयत्याने मारहाण करून जखमी केले आहे. ही घटना बिबवेवाडीतील शिवतेजनगरमध्ये घडली असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर एकजण फरार आहे.
अनिल उर्फ शक्ती शिवशरण (वय 20), नितीन गोपीनाथ फुलारी (वय 20, रा. बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर बाळू पवार असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सचिनने (नाव बदलले आहे) बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन कुटूंबीयांसह बिबवेवाडीत राहायला असून त्याच परिसरात असलेल्या अनिल उर्फ शक्तीचे सचिनच्या बायकोशी प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याची माहिती सचिनला मिळाल्याने त्याने दोघांच्या प्रेमाला विरोध केला. त्याचा राग आल्यामुळे अनिलने सचिनला उलट्या कोयत्याने मारहाण करून जखमी केले. नितीन आणि बाळूने लोखंडी पट्टीचा धाक दाखवून सचिनला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलीस हवालदार शिंदे तपास करीत आहेत.



























































