पैसा, सोने-नाणे घेऊन 3 मुली गायब झाल्या अन् कुटुंबीयांसह पोलिसांचे धाबे दणाणले, पण…

1196
प्रातिनिधिक फोटो

कोपरगाव तालुक्यातील वारी येथील इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांना कोणीतरी फुस लावून पळवून नेल्याचा गुन्हा कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी दत्तात्रय जाधव यांनी तक्रार दिली आहे.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, वारी येथून या तीन मुली बुधवारी 26 फेब्रुवारीला सकाळी 9.30 वाजल्यापासून बेपत्ता झाल्या. तिघींच्या अंगावर शाळेचे गणवेश होते. तिन्ही मुलींनी पळून जाताना घरातील पैसा, सोने-नाणे व मोपेड घेऊन गायब झाल्या आहेत.

सदर मुली शाळेतून गायब झाल्यानंतर त्यांची शोधाशोध सुरु झाली. शोधाशोध केल्यानंतर काही तासातच या तिन्ही मुली नातेवार्इकांकडे सापडल्या. निर्भयासारख्या घटना सातत्याने घडत असताना या मुलींनी पळून जाणे शाळेच्या व पालकांच्या दृष्टीने चिंताजनक होते. परंतु या मुलींचा सुगावा लागल्यानंतर त्यांना पालकांनी ताब्यात घेऊन समज दिल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या