दहशतवादी वाणीसाठी शोकसभा घेण्याचा प्रयत्न करणारे तीन विद्यार्थी निलंबित 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aligarh-muslim-university

सामना प्रतिनिधी । अलीगढ

काश्मीर खोऱ्यात सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत ठार झालेला अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील पीएचडीचा माजी विद्यार्थी आणि हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर  मन्नान वाणीच्या मृत्यूनंतर शोकसभा घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना विद्यापीठाने निलंबित केले आहे. मन्नान अलीगढ मुस्लिम विद्यापीठात रिसर्च स्कॉलर होता. पीएचडीचे शिक्षण अर्धवट सोडून तो हिझबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.

कश्मीर  खोऱ्यातील हंदवाडात  बुधवारी हिंदुस्थानी लष्कराने मन्नानसह तीन दहशतवाद्यांना चकमकीत ठार केले होते. मन्नान मारला गेल्याचे कळताच अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील ( एएमयु ) केनेडी सभागृहात १२ विद्यार्थी जमले.त्यांनी वाणीसाठी नमाज अदा करायला  सुरुवात केली. हा विद्यापीठाच्या नियमांचा भंग असल्याचे सांगत विद्यापीठाचे प्रॉक्टर मोहसीन खान यांनी बेकायदा शोकसभा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन कश्मिरी विद्यार्थ्यांना निलंबित केले.

चार विद्यार्थ्यांना करणे दाखवा नोटीस 

मन्नानसाठी शोकसभा घेणाऱ्या अन्य चार विद्यार्थ्यांना विद्यापीठाने करणे दाखवा नोटीस बजावली आहे. या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक रेकॉर्ड आता तपासला जाणार आहे. अलीगढ मुस्लिम विद्यापीठ विद्यार्थी परिषदेनेही या विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांसाठी नमाज अदा करण्यापासून रोखले होते.  तर या घटनेची दखल मनुष्यबळ मंत्रालयाने घेतली असून यावर अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आले आहेत.