शहीद औरंगजेबचा घेतला बदला, कश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
encounter-underway-between-jawan-terrorist

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू कश्मीरमधील पुलवामामध्ये सेना आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आले आहे. तर अनंतनागमध्ये जो दहशतवादी मारला गेला त्याचे नाव शौकत अहमद आहे. ज्या दहशतवाद्यांनी औरंगजेबला मारले त्यात शौकतचा समावेश होता.

अवंतीपुरामधील पंजगाम गावात दहशतवादी आणि सैन्यात चकमक उडाली. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. त्यापैकी एकाचे नाव शौकत अहमद डार आहे.

त्यानंतर जम्मू कश्मीरच्या काही भागात दहशतवादी हल्ल्याचा ऍलर्ट जारी केला आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात दहशत पसरवण्यासाठी दहशतवादी पुन्हा कार्यरत आहेत. याकारणाने सुरक्षा दलाने संपूर्ण खोर्‍यात हाय ऍलर्ट जारी केला आहे.

गेल्या काही दिवसांत या चकमकींमध्ये वाढ झाली आहे. सैन्यापुढे फक्त सीमेपलीकडून असलेल्या दहशतावाद्यांचे आव्हान नसून खोर्‍यातील दहशतवाद्यांचा प्रश्न आहे. गुरूवारी पुलावामाध्ये एक मोठी चकमक उडाली त्यात तीन दहशतवादी ठार झाले होते.