‘ती तुझी शेवटची मालिका असेल’, स्लेजिंग करणाऱ्या पेनला अश्विनने जागा दाखवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिडनी क्रिकेट मैदानावर झालेला रोमहर्षक कसोटी सामना अनिर्णित राखण्यात टीम इंडियाला यश आले. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी पुजारा, पंत, विहारी आणि अश्विन यांनी मैदानावर नांगर टाकला. पंत आणि पुजाराने अर्धशतकीय खेळी केली. तर विहारी आणि अश्विन यांनी नाबाद खेळी करत सामना ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात जाणार नाही याची काळजी घेतली.

सिडनी कसोटीचा पाचवा दिवस स्लेजिंग, बॉडी लाईन गोलंदाजी आणि खेळपट्टीशी छेडछाड यामुळेही गाजला. विहारी आणि अश्विन वेगवान व फिरकी माऱ्याला दाद देत नसल्याचे पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपले खरे रुप दाखवत स्लेजिंग सुरू केली आणि खेळाडूंचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला.

INDvsAUS पंतला बाद करण्यासाठी पिचसोबत छेडछाड, स्मिथचा ‘डर्टी गेम’ कॅमेऱ्यात कैद

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि आर. अश्विन यांच्यातील संवाद यष्ट्यांमध्ये असणाऱ्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. टीम इंडियाच्या डावातील 122 व्या षटकात टीम पेन याने अश्विनचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दोघांमधील संवाद

टीम पेन – एश (अश्विन), तुझी गाबावर येण्याची वाट पाहू शकत नाही.
(टीम पेन याच्या या विधानाला आर. अश्विन यानेही जशास-तसे उत्तर दिले)
आर. अश्विन – तुझी हिंदुस्थानमध्ये येण्याची वाट पाहू शकत नाही, ती तुझी अखेरची मालिका असेल.

ब्रिस्बेनमध्ये चौथा सामना

दरम्यान, चार कसोटी सामन्यांची मालिका 1-1 बरोबरीत असून चौथा सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जाणार आहे. या मैदानावर ऑस्ट्रेलियाचे एकहाती वर्चस्व असून 1988 पासून यजमानांनी येथे एकही कसोटी सामना गमावलेला नाही.

स्लेजिंग, बाऊंसर, वेदना आणि जिगरबाज टीम इंडिया! तब्बल 41 वर्षांनंतर ‘असं’ घडलं