आम्ही हे करू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकदा काही छोटय़ा गोष्टी करायचं ठरवलं तरी त्या होतातच असे नाही. पण त्या केल्या, तर आरोग्यच चांगलं राहात नाही, तर आपली जीवनशैली सुधारते.

>सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स निघून जातात. त्यानंतर दिवसभरात 7 ते 8 ग्लास पाणी पिणे आरोग्याच्या हिताचेच असते.

>नाश्ता टाळल्यास लठ्ठपणा वाढण्याची शक्यता जास्त असते. पौष्टिक नाश्ता केला तर दिवसभर अरबट चरबट खाण्यापासून सुटका होते.

>बहुतांश आजार हातांद्वारेच पसरतात. त्यामुळे जेवणापूर्वी आणि वॉशरूमला जाऊन आल्यावर हात साबणाने धुणे गरजेचे आहे.

>वयोमानानुसार नियमितपणे हेल्थ चेकअप करून घेणे आवश्यक ठरते. कारण त्यामुळे बरेच आजार आधीच कळू शकतात.

>पुरेशी झोप घेतल्याने लठ्ठपणा, डायबिटीस, हृदयरोग, ताणतणाव या आजारांपासून वाचता येते.

>ताणतणाव हेच अनेक आजारांचे मूळ असते. रोज खूश राहिल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे आजारांपासून दूर राहाता येते.

>शारीरिकदृष्टय़ा सक्रिय राहिल्याने रक्तदाब नियंत्रणात राहाते. त्यामुळे डिप्रेशन, डायबिटीस आणि हृदयरोगांपासून बचाव करता येतो.

>कोणत्याही प्रकारचा नशा शरीरासाठी घातकच असते. त्यामुळे यकृत, हृदय, मूत्राशय आणि मेंदूवर वाईट परिणाम होतो.

>मीठ, साखर, तांदूळ, मैदा असे पांढरे खाद्यपदार्थांमध्ये कॅलरीज जास्त असतात, पण न्यूट्रिशन मात्र कमी आढळतात.

>फळे आणि भाज्यांमध्ये फायबर न्यूट्रिशन भरपूर असते, पण कॅलरीज कमी असतात. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.