असं झालं तर… तुमचे रेल्वेचे तिकीट हरवले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रवासात निघताना एखाद्वेळेस रेल्वेचे तिकीट सापडत नाही. तिकीट नेमके कुठे ठेवले ते आठवत नाही किंवा आपल्या हातून हरवते. मग अशा वेळी काय करायचे, हा प्रश्न पडतो.

ऑनलाईन तिकीट असेल तर ते तुम्ही पुन्हा मिळवू शकता. परंतु काऊंटरवर काढलेले तिकीट कसे मिळवणार. तुम्हाला रेल्वे स्टेशनला जावे लागते. तिथे अर्ज करावा लागतो.

तुमचे रेल्वेचे तिकीट हरवले तर तुम्हाला तिथे डुप्लिकेट तिकीट मिळू शकते. यासाठी कन्फर्म किंवा आरएसी तिकीट असावे लागते. अर्ज भरण्याची प्रक्रिया सोपी आहे.

त्यासाठी तुम्हाला शुल्क द्यावे लागते. स्लीपरमध्ये 50 रुपये आणि  एसीसाठी 100 रुपये प्रति शुल्क आकारले जाते. तुम्हाला मिळालेल्या डय़ुप्लिकेट तिकिटावर प्रवास करता येतो.

त्यामुळे तुम्ही काऊंटरवरून तिकीट काढलेले असेल तर ते जपून ठेवले पाहिजे. तिकीट हरवणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी, जेणेकरून निश्चिंत प्रवास करू शकाल.