
डोसा कुरकुरीत होण्यासाठी डोशाचे पीठ पातळ असावे. इडलीसारखे जाड नसावे. पीठ व्यवस्थित आंबवलेले असावे. त्यामुळे पिठात हवा राहत नाही. डोसा जाळीदार व कुरकुरीत होतो. डोसा आंबवण्यासाठी उष्ण व ओलसर जागा निवडावी.
भिजवलेले तांदूळ आणि उडदाच्या डाळीत थोडे भिजवलेले किंवा बारीक केलेले पोहे मिसळावे. साधारणपणे चार वाटी तांदूळ आणि 2 वाटी उडदाची डाळ हे मिश्रण कुरकुरीत डोशासाठी योग्य. डोसा करण्याच्या वेळी मीठ घाला.






























































