खिडकीतील झाडे वाढवायची असतील तर…

घरातील खिडकीजवळ लावलेली झाडे वाढवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. सर्वात आधी तुम्ही जे खिडकीच्या जवळ झाड लावले असेल त्यांना पुरेसा नैसर्गिक सूर्यप्रकाश मिळेल, याची खात्री करा. झाडे सरळ वाढवण्यासठी योग्य प्रकारची माती आणि पुरेशा खोल पुंडीचा वापर करा. झाडांना नियमित पाणी द्या.

झाडांना दर महिन्याला संतुलित द्रव खत म्हणजेच लिक्विड फर्टिलायझर द्या. झाडांची पाणे नियमित स्वच्छ करा. त्यावर पाण्याचा फवारा मारायला विसरू नका. तुरटीचा वापर करून कीड, बुरशी आणि मुंग्यापासून झाडांचे संरक्षण करा. प्रत्येक झाडांची काळजी वेगळी घ्या. कोणत्या झाडाला किती पाणी, सूर्यप्रकाश लागतो हे समजून घ्या.