
5 या गोष्टी करा!
- श्राद्धाच्या दिवसांत भगवान श्रीकृष्णाची पूजा केली तर पूर्वजांचे इतर जन्मदेखील सुधारतात. अनेकदा असे होते की पूर्वजांच्या चुकीमुळे त्यांचे पुढील जन्म कष्टदायक असतात. अशा स्थितीत जर भगवान श्रीकृष्णाची पूजा केली तर त्यांचे जीवन सुरळीत होण्यास मदत मिळते.
- श्राद्धाच्या दिवसांमध्ये गीतेचा सातवा अध्याय पठन करावा. कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याने हा अध्याय पठण केला तरी पितरांना मुक्ती मिळते. एवढेच नाही तर भगवान शंकरानेही गीतेच्या या अध्यायाचे महत्त्व सांगितले आहे. श्राद्धाच्या दिवसात हा अध्याय पठण केला तर पूर्वज प्रसन्न होऊन त्यांचा आशीर्वाद मिळेल.
- या दिवसांत कुणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण आपले पूर्वज कोणत्या रुपात येतील सांगता येत नाही.
- गरजूंना मदत करावी. दुसऱ्याची मदत केल्यामुळे आपले कर्म बनतात. लोक वर्षभर लोकांची मदत सहसा करत नाही. पण श्राद्धाच्या या दिवसांत आपल्या पूर्वजांच्या नावाने गरजू किंवा कोणाचीही मदत करणे म्हणजे ईश्वर सेवा करणे होय.
- श्राद्ध हा काही सण नाही. पण या दिवसांत इश्वराला स्मरण करण्याचे असतात. त्यामुळे आपल्या घरातील मंदिरात देवासमोर तुपाचा दिवा अवश्य लावा.
पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचे पुढचे जन्म आनंदात आणि वैभवात जाण्यासाठी पितृपक्षात पूजाअर्चा केली जाते. त्यासाठी आश्विन शुक्ल पक्षाचे 15 दिवस श्राद्धासाठी खास मानले गेले आहेत. वास्तविक प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला, पितरांसाठी श्राद्ध आणि तर्पण केले जाते. पण पितृपक्षातील 15 दिवसांमध्ये जर पितर प्रसन्न झाले तर आपल्या कुटुंबात आनंद येतो आणि जीवनात कसलीच कमतरता येत नाही. पण म्हणूनच श्राद्ध करताना काही गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते.
श्राद्ध दरम्यान तर्पणात दूध, तीळ, कुशा, पुष्प, गंध मिश्रित पाण्याने पितरांना तृप्त केले जाते. ब्राह्मणांना भोजन आणि पिण्ड दानाने पितरांना भोजन दिले जाते. श्राद्धासाठी दुपारी कुतुप आणि
रौहिण मुहूर्त श्रेष्ठ आहे. कुतुप मुहूर्त दुपारी 11:36 वाजेपासून 12:24 वाजेपर्यंत असतो. रौहिण मुहूर्त दुपारी 12:24 ते दिवसा 1:15 वाजेपर्यंत असते. कुतप कालात देणाऱ्या दानाचे अक्षय फळ मिळते. पूर्वजांचे तर्पण प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला करावे लागते.
साधारणपणे वडिलांचे श्राद्ध मुलगा करतो. पण एखाद्या व्यक्तीला मुलगा नसला तर बायकोही श्राद्ध करू शकते. बायको नसल्यास सख्ख्या भावाने श्राद्ध केले पाहिजे. एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त पुत्र असल्यास व्यक्तीच्या श्राद्धाचा मान मोठ्या पुत्राला असतो. केव्हाही रात्री श्राद्ध नाही करू नये म्हणतात. सायंकाळी देखील श्राद्धकर्म केले जात नाही. दुसऱ्यांच्या घरी राहून श्राद्ध नाही करायला पाहिजे. फारच आवश्यक असेल तर भाड्याच्या घरात श्राद्ध करू शकता.




























































