
– दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दररोज एक सफरचंद चावून खा. दात स्वच्छ आणि बळकट होतात.
– जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरा. दातांत अडकलेले कण निघून जातात आणि दात स्वच्छ राहतात.
– सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे दातांच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे.
– दातांसाठी चांगल्या आणि मऊ ब्रशची निवड करावी.
– दातात अडकलेले कण बाहेर काढण्यासाठी सुई, पिन्स, टाचणी अशा टोकदार वस्तूंचा वापर न करता टूथपिकचा वापर करा.
– दही, दूध, संत्र ज्यूस, सुकामेवा, हिरव्या भाज्या यांचा वापर आहारात जास्त करावा. कॉपर, झिंक,आयोडीन आणि पोटॅशियमयुक्त आहार घ्यावा.
– दाताबरोबर जिभेची स्वच्छता राखणे तेवढेच गरजेचे आहे. अन्यथा तोंडाला दुर्गंधी येऊ शकते.
– दातांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच त्यावर उपचार करायला हवेत. अन्यथा दुखणे असह्य होऊन जाते.
– प्रत्येक दोन किंवा तीन महिन्यांत टुथब्रश बदलावा.
– लिंबाच्या रसात पाणी घालून दातांना मसाज केल्याने दात चमकदार होतात
– संत्र्याची साल, तुळशीची पाने वाळवून तयार केलेली पूड दातांवर घासल्याने हिरडय़ांच्या समस्या कमी होतात.
– लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करून त्याच्या गुळण्या केल्याने तोंडाची दुर्गंधी जाते.



























































