Tips : कोरडा खोकल्यावर घरगुती आठ उपाय ठरतील प्रभावी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरड्या खोकल्याची लक्षण वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं हे आवश्यक आहेच. मात्र त्या सोबतच असे काही घरगुती उपाय आहेत जे प्राथमिक उपचार म्हणून यावर काम करतात. या उपायांना आपण घराचा वैद्यही म्हणून शकतो. मात्र हे उपचार सुरू केले तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नये.

How To Get Rid Of Dry Cough

1) गरम पेय

सर्दी, कफ, खोकला असणाऱ्या व्यक्तींना शरीराचं तापमान व्यवस्थित राखणं आणि हायड्रेट राहणं आवश्यक आहे. खोकला जाणवत असल्यास गरम पेय पिल्यानं घशाला आराम मिळतो आणि खोकलाही थांबतो. गरम पाणी, हर्बल चहाने घशात होणारी खवखव कमी होण्यास मदद होते.

2) मिठाच्या पाण्याने गुळण्या

घशात खवखव होणे किंवा खोकला जाणवल्यास घरगुती उपचारही अनेकदा प्रभावी ठरतात. गरम पाण्याच छोट्या चमच्यात अर्धा चमचा मिठ घेऊन पाण्यात एकत्र करायचा. त्यापाण्यानं गुळण्या करायच्या. घशाला त्वरित आराम मिळतो. तसेच दिवसातून दोन ते तीन वेळा असे करत ही कृती आठवडाभर सुरू ठेवल्यास आजार बळावत नाही.

3) आल्याचा प्रभावी वापर

खोकल्यावर अत्यंत गुणाकारी मानलं जातं ते म्हणजं आलं. आल्यामध्ये अँटी-मायक्रोबियल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. ते इम्युनिटी वाढवतात आणि श्वसन मार्गातील अडथळे दूर करतात. तसेच कफाचे प्रमाण कमी करण्यातही महत्त्वाची भूमिका निभावतात.

4) मध

खोकला कमी करण्यासाठी नैसर्गिक पद्धतीनं गोळा करण्यात आलेलं मध हे गुणाकारी ठरतं. एक चमचा मध घेतल्यानंतर घसा साफ होतो, जळजळ कमी होते. मध हे जिवाणू किंवा विषाणूंवर प्रभावीपणे काम करतं.

5) हळद

हळद ही अँटिसेप्टिक म्हणून प्रभावीपणे काम करते. अँटिव्हायरल आणि अँटिइंफ्लेमेटरी एजंट म्हणून शरीराला कोणत्याही प्रकारच्या संक्रमणापासून रोखण्यास मदत करते. हळदीच्या योग्य वापराने श्वसन नलीकेला देखील फायदा होतो आणि ब्राँकायटी आणि टॉन्सिल्सवर उपायकारक ठरते.

6) लीकोरिस रूट

लीकोरिस रूटचा उपाय बऱ्याच काळापासून करण्यात येतो. खोकल्यापासून मुक्ती मिळवण्यात तसंच कफ कमी करण्यात याचा वापर होतो. लीकोरिस रूटपासून बनवलेला चहा घसा मोकळा करण्यास मदत करतो.

7) मार्शमेलो रूट

कोरडा खोकला दूर करण्यासाठी मार्शमेलो रूट हा प्राचीन उपचार मानला जातो. खोकल्यामुळे होणारी घशातील खवखव कमी करण्यास हे प्रभावी ठरते.

8) पुदिन्याची पानं

पुदिन्याच्या पानांमध्ये मेन्थॉल असते, जे घशातील नसांना अॅक्टिव्ह करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावतात. घशात जाणवणार एकप्रकारचा कोरडेपणा दूर करतात. चहामध्ये तीन-चार पुदिन्याची पानं उकळून तसा चहा घेतल्यास घसा अगदी आराम वाटतो.