
डिजिटल आणि ऑनलाईनच्या जमान्यात अलर्ट राहणे खूप गरजेचे आहे. जर थोडी जरी चूक झाली तर मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियाचा वापर करताना जर व्हॉट्सऍपवर संशयास्पद लिंक आली तर त्यावर क्लिक करू नका. थोडा जरी संशय आला तर लिंक ओपन करू नका.
जर लिंक पाठवणारा तुमच्या ओळखीचा नसेल तर त्याला तत्काळ ब्लॉक करा आणि रिपोर्ट करा. कोणत्याही लिंकवर माहिती भरू नका. ओटीपी, पासवर्डची माहिती देऊ नका.
व्हॉट्सऍवर बऱयाचदा आपोआप लिंक तपासली जाते आणि संशयास्पद वाटल्यास तुम्हाला सूचना मिळू शकते. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे अलर्ट राहा.
बंपर ऑफर, मोफत गिफ्ट, लॉटरी जिंकलात अशा फेक मेसेजवर चुकूनही क्लिक करू नका. अनोळखी नंबरवरून आलेल्या क्यूआर कोडला अजिबात स्कॅन करू नका.

























































