तुझ्याशिवाय करमेना! सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला मेसेज केला आणि बसला 1 लाख रुपयांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षटकारांची बरसात करण्यासाठी आणि दमदार खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी खेळाडू उत्सूक असतात. मात्र, त्यासाठी स्टेडियममध्ये असताना मैदान आणि मैदानाबाहेर काही नियमांच पालनही कराव लागत. याच नियमांच उल्लंघन केल्यामुळे एका खेळाडूला चांगलाच दणका बसला आहे. तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये एका क्रिकेटपटून मैदानात मोबाईल वापल्याची घटना समोर आली आहे. सामना सुरू असताना गर्लफ्रेंडला मेसेज करण या खेळाडूला चांगलच महागात पडलं आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने (ACSU) त्याच्यावर 1 लाख रुपयांचा दंड ठोठावून त्याला चालू स्पर्धेतून बाहेर केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेळाडूने सामना सुरू असताना आपल्या गर्लफ्रेंडशी चॅट केल्याचे उघड झाले आहे. मात्र, या प्रकरणाचा कोणतीही मॅच फिक्सिंग, सट्टेबाजी किंवा बुकींशी संपर्काशी संबंध नाही. खेळाडूवर बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे, ज्यानुसार खेळाडूंना खेळाच्या दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात (PMOA) मोबाईल बाळगण्यास सक्त मनाई असते. ही बातमी समजल्यानंतर क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. खेळाडूची ओळख अद्याप गुप्त ठेवण्यात आली असून तो डाव्या हाताचा फलंदाज असल्याचे समजते. याआधीही आयपीएल 2026 मध्ये अशाच प्रकारच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.