हिरव्या मिरच्या महिनाभर टिकवण्यासाठी या सोप्या टिप्स अमलात आणायलाच हव्यात, वाचा

स्वयंपाकघरात हिरव्या मिरच्या जवळजवळ दररोज वापरल्या जातात. भाज्यांमध्ये मसाले कमी प्रमाणात हवे असल्यास, हिरव्या मिरचीचा वापर हा प्रामुख्याने केला जातो. हिरव्या मिरच्या या आपल्या स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग आहेत. अनेकदा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यानंतरही, हिरव्या मिरच्या लवकर खराब होतात किंवा सुकतात. हिरव्या मिरच्या अधिक काळ टिकण्यासाठी काही टिप्स अमलात आणायला हव्यात.

अंडी अधिक काळ टिकावी म्हणून काय करायला हवं?

हिरव्या मिरच्या साठवण्यासाठी स्वयंपाकघरातील टिप्स

हिरव्या मिरच्या धुतल्यानंतर, ओलावा काढून टाकण्यासाठी त्या पुसून कोरड्या करायला हव्या. त्यानंतर त्या मिरच्या हवाबंद डब्यात किंवा झिपलॉक बॅगमध्ये ठेवाव्या. त्यानंतर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. अशा पद्धतीने ठेवलेल्या मिरच्या या किमान दोन ते तीन आठवडे तश्याच ताज्या राहतात.

हिरव्या मिरच्या बराच काळ ताज्या ठेवण्यासाठी टिश्यू पेपर खूप उपयुक्त आहे. मिरच्या धुतल्यानंतर त्या वाळवून नंतर, टिश्यू पेपरमध्ये गुंडाळाव्यात. टिश्यू पेपर ओलावा शोषून घेतो आणि मिरच्या खराब होण्यापासून रोखतो.

उत्तम आरोग्यासाठी मासांहरींनी आहारात हे समाविष्ट करायलाच हवे, वाचा

हिरव्या मिरच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवताना कायम देठ काढून ठेवाव्यात. हवं असल्यास त्यात थोडे मीठ घालून साठवून ठेवावे. यामुळे मिरच्या लवकर खराब होत नाहीत आणि अधिक काळ ताज्या राहतील.