स्वामी गीतांची आज ‘डिजिटल’ पर्वणी

श्री शंकर महाराज यांच्या 74 व्या पुण्यतिथी सप्ताहानिमित्त स्वामीराज प्रतिष्ठान निर्मित ‘स्वामी ओम’ या कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्वामी भक्तांना तारकमंत्रासह स्वामी गीतांचा आनंद घेता येईल. प्रसिद्ध संगीतकार, गायक शशिकांत मुंबरे ‘लाईव्ह’ गाणी सादर करतील तर रघुनाथ दळवी निरुपण करतील. हा कार्यक्रम आज 18 मे रोजी सायंकाळी 7 वाजता ‘श्री शंकर महाराज परिवार’ या फेसबुक पेजवर ऐकता येईल.

‘स्वामी ओम’ कार्यक्रमातील मूळ गीतांचे गीतलेखन श्रावण बाळ व संगीत संयोजन अशोक वायंगणकर यांनी केले असून निर्मिती स्वामीराज प्रतिष्ठानच्या वतीने अथर्व राणे व रजनी राणे यांनी केली आहे. यातील गीते सुरेश वाडकर व साधना सरगम अशा दिग्गज गायकांनी गायलेली असून ती आता या गीतांचे संगीतकार शशिकांत मुंबरे यांच्याच आवाजात ऐकणे ही स्वामीभक्तांसाठी पर्वणी असेल. या भक्तीसंगीत संध्येचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजन प्रथमेश लोके यांनी केले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी www.facebook.com/shreeshankarmahajaj या लिंकवर भेट द्यावी.

आपली प्रतिक्रिया द्या