
टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी महिला खेळाडूंच्या विजयाचा सिलसिला सुरू झाला आहे. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू हिने रौप्य पदक मिळवलं. आता बॉक्सिंग खेळातही हिंदुस्थानला विजय मिळाला असून हिंदुस्थानची सुपरमॉम मेरी कोम हिने दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे.
सहा वेळा जागतिक अजिंक्यपदाची मानकरी ठरलेली मेरी कोम हिने 51 किलो वजनी गटाच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. मेरीने डोमिनिका गणराज्याची मिगुएलिना हर्नांडिज गार्सिया हिचा 4 -1 असा सहज पराभव केला.
पुढच्या फेरीत मेरीचा सामना कोलंबियाची तृतीय मानांकित लोरेना व्हिक्टोरिया वेलेंसिया हिच्याशी होणार आहे. मेरी कोम ही दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची मानकरी ठरलेली 38 वर्षांची मेरी ही तीन मुलांची आई आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ती 51 किलो वजनी गटात खेळत आहे. मार्च 2020मध्ये तिने ऑलिम्पिकसाठी पात्रता फेरी पूर्ण केली होती.



























































