टोकियो ऑलिम्पिक पुढल्या वर्षीही अशक्यच, मेडिकल एक्सपर्टकडून व्यक्त करण्यात आली भीती

542

कोरोनामुळे या वर्षी होणारे टोकियो ऑलिम्पिक पुढल्या वर्षी ढकलण्यात आले. मात्र पुढल्या वर्षी अर्थातच 2021 सालामध्येही जगातील मानाची स्पर्धा म्हणून ओळखले जाणारे ऑलिम्पिक होणे अशक्यच असल्याचे मेडिकल एक्सपर्ट यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जपान, टोकियोचे सरकार, आयोजकांकडून यंदाचे ऑलिम्पिक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाकर अद्याप लस तयार करण्यात आलेली नाही. तसेच कोरोना अद्याप नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे पुढल्या वर्षी होणाऱया टोकियो ऑलिम्पिकच्या योजनाबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. या वर्षअखेरीस या स्पर्धेच्या योजनाचा आराखडा तयार करण्यात येईल असे आयोजक व सरकारकडून सांगण्यात आले.

लसीचा पुरवठा शक्य नाही
– टोकियो ऑलिम्पिक पुढल्या वर्षी आयोजित करण्यात येणार आहे. तोपर्यंत या विषाणूवर लस आली तरी स्पर्धा घेणे अवघडच असणार आहे. कारण मोठय़ा प्रमाणात लसीची पुरवठा व्हायला हवा. तो इतक्या लवकर होणे शक्य नाही. ऑलिम्पिकमध्ये 200पेक्षा जास्त देशांतील खेळाडूंचा सहभाग असतो हेही लक्षात घ्यायला हवे, असे त्या मेडिकल एक्सपर्टने पुढे सांगितले.

मोठय़ा स्पर्धांमुळे देशात कोरोना पसरणारच
– कोरोनासारख्या व्हायरसवर नियंत्रण मिळवणे अशक्यच आहे. अशामध्ये टोकियो ऑलिम्पिकसारख्या मोठय़ा स्पर्धेचे आयोजन आपल्या देशात झाल्यास कोरोना आपल्या देशात पसरणारच हे निश्चित आहे. असे एका मेडिकल एक्सपर्ट याच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या