टॉम क्रूझने परत केले तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॉलिवूडमधील प्रतिष्ठेचा गोल्डन ब्लोब ऍकॉर्ड 2022 सोहळा अडचणीत सापडला आहे. पुढच्या वर्षी या सोहळ्याचे प्रक्षेपण करणार नसल्याचे एनसीबी नेटवर्कने जाहीर केले आहे. त्यातच भर म्हणजे टॉम क्रूझ, स्कारलेट जोहानन्सन यासारख्या मोठय़ा कलाकारांनी आणि अनेक लोकप्रिय हॉलिड स्टुडियोंनी आपल्याला मिळालेले गोल्डन ग्लोब पुरस्कार परत केले आहेत.

गोल्डन ग्लोब पुरस्कार देणारी संस्था ‘द हॉलिवूड फॉरन प्रेस असोसिएशन’ (एचएफपीए) विरोधात हॉलिवूडमध्ये आक्रोश वाढला आहे. त्याला टॉम क्रूझने पाठिंबा देत पुरस्कार नाकारले आहेत. क्रूझ यांना 1990 साली ‘बॉर्न ऑन फोर्थ ऑफ जुलै’साठी तर 1997 साली ‘जेरी मॅगुएरे’ या सिनेमासाठी गोल्डन ग्लोब मिळाला होता. त्यानंतर 2000 साली ‘मॅगनोलिया’ सिनेमासाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. हे तिन्ही पुरस्कार त्यांनी आता परत केले आहेत.

नेमके काय घडले

एचएफपीए ही सुमारे 90 आंतरराष्ट्रीय पत्रकारांची संस्था आहे. त्यातील 87 पत्रकारांकर वंशद्वेश, लिंगभेदभाव, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. वंशद्वेष करताना या असोसिएशनने जोहानसन आणि मार्क रफ्फालो यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींचीदेखील निंदा केलेली आहे. त्यामुळे एचएफपीएमध्ये सुधारणा व्हावी, अन्यथा या संघटनेला हॉलिवूडमधून बाहेर करावे, अशी मागणी गेल्या आठकडय़ापासून जोर धरत आहे.