Toolkit – दिशा रवीला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी

टूलकिट प्रकरणात पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. दिशाने आपल्यावरील सर्व आरोप शांतनू मुळूक आणि निकिता जेकब यांच्यावर ढकलले आहेत. त्यामुळे या प्रकरणात सहआरोपी असलेले शांतनू आणि निकिता यांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. त्यासाठी दिल्ली पोलिसांनी न्यायालयाकडे पाच दिवसांची कोठडी मागितली होती.

टूलकिट हे राजधानी दिल्लीत प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचारासाठीची पूर्वतयारी होती. या आरोपावरून दिल्ली पोलीसांनी 22 वर्षीय दिशा रवीला बंगळुरूमधून 14 फेब्रुवारीला अटक करून तिच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात दिशा रवीला शुक्रवारी दिलेली तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सोमवारी संपणार होती. म्हणून तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी आणखी एक दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात शनिवारी न्यायालयाने दिशा रवीच्या जामीन अर्जावर सुनावणी केली. यासंदर्भातील निर्णय राखून ठेवला असून मंगळवारी न्यायालय त्यावर निर्णय देणार आहे. दिशा रवीने टेलिग्राम अॅपच्या माध्यमातून ग्रेटा थनबर्गला टूलकिट पाठवलं व ते ग्रेटाने शेअर करावे, यासाठी प्रयत्न केले असा दिल्ली पोलिसांचा दावा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या