‘टच’ संस्था पुरवणार गरजूंना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘टच’ ही संस्था गेली 25 वर्षे रस्त्यावर राहणाऱया बेघर, वंचित व निराधार मुलांना दत्तक पालक योजनेतून शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोरोनाकाळात रुग्णांना भासणारी ऑक्सिजनची गरज लक्षात घेता गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध करून देण्यास ‘टच’ने पुढाकार घेतला आहे.

कोविड काळामध्ये ज्या रुग्णांची ऑक्सिजन लेवल कमी असेल आणि श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल अशा रुग्णांसाठी ‘टच’ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध करून देत आहे. ज्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यांनुसार ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर गरज भासेल त्यांनी ‘टच’ संस्थेचे प्रकल्प समन्वयक योगेश सरोदे यांच्याशी 9819453873 /8766825485 या क्रमांकावर संपर्क साधवा, असे आवाहन ‘टच’ या संस्थेने केले आहे.