
टोयोटा किर्लोस्कर मोटर (Toyota Kirloskar Motor) ने बाजारात कॉम्पॅक्ट एसयूव्ही वर्गात मोडणारी नवी कार Toyota Urban Cruiser HyRyder टोयोटा हायरायडर आणली आहे. ही कार हायब्रीड पद्धतीची आहे म्हणजेच ही कार पेट्रोल आणि वीजेवर चालते. या गाडीमुळे महिन्याला सर्वसाधारणपणे पेट्रोलसाठी 4,000 रुपये खर्च होणार असेल तर या गाडीसाठी जवळपास 2,500 रुपयेच खर्च होतील.
Toyota Urban Cruiser HyRyder या कारमध्ये 1.5 लिटरचे पेट्रोल इंजन आहे. या गाडीत Toyota चे हाइब्रीड तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच या गाडीमध्ये एक स्वत:हून चार्ज होणारी मोटार जोडण्यात आली आहे. यामुळे जेव्हा ही कार धावायला लागते तेव्हा त्यातील इलेक्ट्रिक मोटार ही गाडीला गती देते (Tork) गाडीचा एक्सलरेटर दाबल्यास गाडीतील पेट्रोल इंजिनाला अधिक ताकद देते. या दोन्हीच्या एकत्रित बळामुळे गाडी लवकर वेग पकडते. पेट्रोल आणि वीज दोन्हीवर ही गाडी धावत असल्याने याला हायब्रीड कार असं म्हटलं जातं.
पेट्रोल आणि इलेक्ट्रीक मोटार या दोन्हीच्या वापरामुळे ही कार प्रवासातील 60 टक्क्यांपेक्षा अधिकचा काळ इलेक्ट्रीकवरच धावते. यामुळे पेट्रोलच्या वापरामुळे होणारे कार्बन उत्सर्जन कमी होतं आणि गाडीला अधिक मायलेज मिळते. (कमी इंधनात अधिक अंतर गाठणे) बाजारातील बहुतांश गाड्या अशा आहेत ज्यामधील इलेक्ट्रीक बॅटरी ही गाडीतील इंधनामुळे चार्ज होत असते. इलेक्ट्रीक गाड्यांना चार्जिंग सुविधेचा वापर करून चार्ज करावं लागतं. या गाडीचं वैशिष्ट्य हे आहे की या गाडीला बाहेरून चार्ज करण्याची गरज पडत नाही. गाडीला जेव्हा जेव्हा ब्रेक लावला जातो तेव्हा गाडीतील जनरेटर गाडीची बॅटरी चार्ज करत राहातो. ही गाडी बहुतांश काळ इलेक्ट्रीक मोडवरच चालत असल्याने ती जास्त आवाज करत नाही. ही गाडी हायब्रीड पद्धतीची असल्याने पेट्रोल,डिझेलच्या गाड्यांच्या तुलनेत हिला इंधन कमी लागतं.






























































