टोयोटा किर्लोस्करचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

टोयोटा या गाड्यांच्या ब्रँडला लोकप्रियतेच्या शिखरावर नेणारे व वाहन उद्योग क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते 64 वर्षांचे होते. टोयाटा इंडियाने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. विक्रम किर्लोस्कर हे टोयोटा किर्लोस्कर मोटारचे उपाध्यक्ष होते.

”आम्हाला कळविण्यास दुख होत आहे की टोयोटा किर्लोस्करचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे अकाली निधन झाले आहे. या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांप्रति आणि मित्रांप्रति आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. विक्रम किर्लोस्कर यांच्यावर 30 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता हेब्बल स्मशानभूमी, बेंगळुरू येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.’ असे ट्विच टोयोटा इंडियाने केले आहे.