ट्रेलर आणि डंपरमध्ये सापडून गाडीचा चुराडा, भीषण अपघातात पाच जण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यात भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रेलर आणि डंपरने धडक मारल्याने एका बोलेरो गाडीचा चुराडा झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांपैकी सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत.

मुरैना जिल्ह्यातील नूराबाद परिसरात राष्ट्रीय महामार्ग – 44 वर मंगळवारी मध्यरात्री 1 वाजता हा अपघात घडला. एका कुटुंब या बोलेरो गाडीतून ग्वाल्हेरहून परतत होतं. या दरम्यान समोरन येणाऱ्या ट्रेलरने बोलेरोला धडक दिली. त्यानंतर लगेच पाठून आलेल्या डंपरने देखील बोलेरोला धडक दिली. त्यामुळे दोन्ही गाड्यांमध्ये सापडल्याने बोलेरोचा चक्काचूर झाला.

या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जण दगावले आहेत. रामपत मुरली गुर्जर, देवेंद्र निहाल सिंह गुर्जर, भगत केदार सिंह गुर्जर, केशव आशाराम गुर्जर, विद्याराम रघुवीर सिंह गुर्जर अशी या पाच जणांची नावं आहेत. हे पाच जण बित्तोली येथील रहिवासी होते. ते आपल्या नातेवाईकाच्या मुलाला रुग्णालयात पाहण्यासाठी गेले होते.
या अपघातात तीन जण जखमी झाले असून त्या बोलेरो चालकाचाही समावेश आहे.