राज्यातील 37 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱयांच्या बदल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील 37 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱयांच्या आज बदल्या करण्यात आल्या. त्यातील पाच विशेष महानिरीक्षक अधिकाऱयांना अपर पोलीस महासंचालकपदी तर तिघा उपायुक्तांना उपमहानिरीक्षपदी बढती देण्यात आली. राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याकडे सुधारसेवा विभागाच्या अपर महासंचालक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

अपर महासंचालकांच्या बदल्या पुढीलप्रमाणे –  रितेश कुमार यांच्याकडे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर महासंचालक पद सोपविण्यात आले आहे. याशिवाय संजय वर्मा आता राज्याच्या नियोजन व समन्वय विभागाचे तर एस. जगन्नाथन राज्य विद्युत महांमडळ सूत्रधारी कंपनी मर्यादितचे प्रमुख असतील. संजीव सिंघल यांच्याकडे आस्थापना विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. अर्चना त्यागी आता राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालिका म्हणून काम पाहतील. प्रशांत बुर्डे यापुढे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण विभागाचे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून काम पाहतील. अनुप सिंह यांना राज्याच्या प्रशासन विभागाचे प्रमुख पद देण्यात आले आहे. सुनील रामानंद दळणवळण व परिवहन विभागाच्या संचालकपदी काम करतील.

मुंबईतील दोन उपायुक्त राजीव जैन, अभिषेक त्रिमुखे तर पिपंरी चिंचवडचे उपायुक्त सुधीर कलय्या हिरेमठ यांना उपमहानिरीक्षकपदी बढती देण्यात आली. राजीव जैन आता मुंबईच्या विशेष शाखेचे अपर आयुक्त, अभिषेक त्रिमुखे राज्य राखीव पोलीस बलाचे उपमहानिरीक्षक तर हिरेमठ यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपमहानिरीक्षकपदी बढतीवर बदली करण्यात आली.

अपर आयुक्तांच्या बदल्या पुढीलप्रमाणे – प्रवीण पडवळ – मुंबई उत्तर प्रादेशिक विभाग, डी.आर. कराळे – सोलापूर शहर आयुक्त, अनिल कुंभारे – राज्य राखील पोलीस बल, दिलीप सावंत – दक्षिण प्रादेशिक विभाग, बी.जी. शेखर – उपमहानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, सत्यनारायण – मुंबई वाहतूक, आर.एल. पोकळे – पश्चिम विभाग, ठाणे शहर; महेश घुर्ये – नवी मुंबई गुन्हे शाखेचे अपर आयुक्त.

मुंबई वाहतूक विभागाचे सहआयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे  राज्याच्या सायबर विभागाची तर राजवर्धन सिन्हा यांच्याकडे वाहतूक विभागाचे सहआयुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पाच अधिकारी अपर महासंचालकपदी

प्रवीण साळुंखे यांना अपर महासंचालक म्हणून राज्याच्या विशेष अभियानाची जबाबदारी देण्यात आली. मधुकर पांडे यांची राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अपर महासंचालक, ब्रिजेश सिंह आता गृहरक्षक दलाचे उपमहासमादेशक असतील. चिरंजीव प्रसाद राज्य राखीव पोलीस बलाचे प्रमुख म्हणून काम पाहतील, तर डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची अपर महासंचालक म्हणून वैद्यमापन शास्त्र विभागचे प्रमुख पद देण्यात आले आहे.