
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या वनअधिकाऱ्यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक मईपोक्कीम अय्यर यांची मुख्य वनसंरक्षक (भुमी अभिलेख), नागपूर या पदावर बदली करण्यात आली. वनसंरक्षक प्रकाश लोणकर यांची वनसंरक्षक (सामाजिक वनिकरण), नाशिक येथे तर उपवनसंरक्षक डी. एम. भट यांची संचालक, कुंडल वनविकास, प्रशासन व व्यवस्थापन अकादमी, कुंडल (सांगली) येथे बदली करण्यात आली आहे.
उप वनसरक्षक सिध्देश सावर्डेकर यांची उपवनसंरक्षक, भामरागड येथे, उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला यांची उपवनसंरक्षक (कार्य आयोजना), नागपूर येथे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, जळगावचे एस. डी. वाढई यांची उपवनसंरक्षक, बलढाणा येथे, बलढाणाचे उपवनसंरक्षक बी. टी. भगत यांची उपवनसंरक्षक (कार्य आयोजना) धुळे येथे आणि गिन्नी सिंग यांची उपवनसंरक्षक (वनसंवर्धन), नागपूर येथे बदली करण्यात आली आहे.





























































