पर्नोद रिकार्ड इंडिया फाऊंडेशनतर्फे ट्रान्सजेण्डर तरुणांसाठी ट्रान्‍सफॉर्मेशन फेलोशीप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्नोद रिकार्ड इंडिया फाऊंडेशनने आज ट्रान्‍सजेण्‍डर समुदायासाठी हिंदुस्थानातील पहिला अॅकॅडेमिक कॉर्पोरेट फेलोशिप प्रोग्राम लाँच करण्‍यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्‍सेस (टीआयएसएस) आणि कलेक्टिव्‍ह गुड फाउंडेशन (सीजीएफ) यांच्‍यासोबतच्‍या सहयोगाची घोषणा केली. हा प्रोग्राम जगभरातील वंचित समुदायांमधील ट्रान्‍सजेण्‍डर्सना कॉर्पोरेट क्षेत्रामध्‍ये त्‍यांचे करिअर घडवण्‍यास पद्धतशीरपणे सक्षम करेल.

हा फेलोशिप प्रोग्राम त्‍यांना कॉर्पोरेट क्षेत्रामध्‍ये व्‍यवस्‍थापकीय व उच्‍च पदांपर्यंत पोहाचण्‍यास सक्षम करण्‍यासाठी पुरेसे प्रशिक्षण व अनुभव देईल. 18 ते 25 वर्षे वयोगटातील ट्रान्‍सपर्सन्‍स या प्रोग्रामसाठी अर्ज करू शकतात आणि अर्जदारांसाठी कोणतीही उच्‍च शिक्षण मर्यादा नाही. ऑनलाइन प्रक्रिया, त्‍यानंतर समूह चर्चांची फेरी व वैयक्तिक मुलाखतींच्‍या माध्‍यमातून या अर्जदारांना शॉर्टलिस्‍ट करण्‍यात येईल. 20 फेलोंची पहिली बॅच 1 जुलैपासून सुरू होणार आहे. एक-वर्ष फेलोशीपसाठी अर्जप्रक्रिया आता सुरू आहे. 30 एप्रिल 2022 रोजी बंद होणार आहे.

या प्रोग्रामबाबत बोलताना पर्नोद रिकार्ड इंडिया येथील सीएसआरचे प्रमुख व चीफ सस्‍टेनेबिलिटी ऑफिसर शशीधर वेम्‍पाला म्‍हणाले, ” पर्नोद रिकार्ड इंडिया स्‍थानिक विकासाला चालना देत समुदायांमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याचा प्रयत्‍न करते. ग्रामीण भागांमधील महिला, दिव्‍यांग व्‍यक्‍ती आणि इतर अल्‍पसंख्‍याक गटांसह एलजीबीटीक्‍यूआयएला सक्षम करणे हा आमच्‍या सामाजिक परिवर्तन आणि इनक्‍यूबेशन दृष्टीकोनाचा भाग आहे. आम्‍ही समान कार्यस्‍थळे निर्माण करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, जेथे व्‍यक्‍ती त्‍यांची लैंगिक ओळख किंवा लैंगिक व सांस्‍कृतिक वृत्तीकडे न पाहता त्‍यांच्‍या क्षमतांना दैनंदिन कामकाजामध्‍ये उपयोगात आणू शकतात.”

पर्नोद रिकार्ड इंडिया येथील इन्‍क्‍लुजन अॅण्‍ड डायव्‍हर्सिटीच्‍या प्रमुख झैनाब पटेल म्‍हणाल्‍या, ‘जग विशेषत: ट्रान्‍सपर्सन्‍ससाठी अत्‍यंत अवघड आहे, ज्‍यांना सतत पूर्वाग्रहांचा सामना करावा लागतो आणि त्‍यांच्‍यामधील कौशल्‍यांनुसार त्‍यांचे कधीच परीक्षण केले जात नाही. म्‍हणूनच सर्वसमावेशक संस्‍कृती निर्माण करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. यामुळे ट्रान्‍सपर्सन्‍ससाठी लाभदायी रोजगार मिळण्‍यासाठी आधारस्‍तंभ निर्माण होईल आणि ही बाब पीआरआयचे तत्त्व व लोक, भूमाता व समुदायाप्रती त्‍यांच्‍या कटिबद्धतेमध्‍ये दृढपणे सामावलेले आहे. हा उपक्रम ट्रान्सपर्सन्‍ससाठी समान कामाच्या संधींची इकोसिस्टम तयार करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.’

या प्रोग्रामबाबत बोलताना मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्‍सेसच्‍या स्‍कूल ऑफ मॅनेजमेंट अॅण्‍ड लेबर स्‍टडीजचे डीन व प्रोफेसर प्रो. सत्‍यजित मजुमदार म्‍हणाले, ”इन्स्टिट्यूटला नेहमीच अत्‍याधुनिक संशोधन, समकालीन कोर्स अभ्‍यासक्रम आणि प्रत्‍यक्ष कृतीच्‍या माध्‍यमातून समान समाज निर्माण करण्‍याच्‍या दृष्टीकोनामधून मार्गदर्शन मिळत आले आहे. ”

एक-वर्ष फेलोशिप प्रोग्राम दोन विशिष्‍ट टप्‍प्‍यांमध्‍ये विभागण्‍यात आला आहे. पहिल्‍या टप्‍यामध्‍ये टीआयएसएस येथील प्राध्‍यापक व मार्गदर्शकांद्वारे नेतृत्त्वात 6 महिन्‍यांच्‍या वर्गामध्‍ये सर्वोत्तम प्रशिक्षण व प्रकल्‍पकार्याच्‍या माध्‍यमाततून व्‍यवसाय विषय व कार्यस्‍थळ कौशल्‍यांमधील सैद्धांतिक क्षमता निर्माण करण्‍याचा समावेश आहे. त्‍यानंतर बहुआयामी अनुभव व अनुभवात्‍मक शिक्षण देण्‍यासाठी आघाडीचे कॉर्पोरेट्स व ना-नफा तत्त्वावर आधारित संस्‍थांमध्‍ये इंटर्नशिप्‍सच्‍या माध्‍यमातून 6 महिने प्रत्‍यक्ष वर्कप्‍लेस इमर्शन घेण्‍यात येईल. प्रत्‍येक फेलोला एकूण 2,40,000 रुपयांची छात्रवृत्ती, तसेच वर्षभर प्रवास व निवासाठी 96,000रुपये देण्‍यात येईल. दोन्‍ही टप्‍प्‍यांदरम्‍यान फेलोजना कॉर्पोरेट्स, उद्योगक्षेत्र व ना-नफा तत्त्वावर आधारित संस्‍थांमधील अनुभवी एलजीबीटीक्‍यूआयए व्‍यावसायिक, प्रमुखांकडून सतत भावनिक व मानसिक-सामाजिक पाठिंबा देण्‍यासोबत करिअर मार्गदर्शन देण्‍यात येईल. यशस्‍वी ग्रॅज्‍युएनशनंतर फेलोना टीआयएसएसकडून पूर्तता प्रमाणपत्रे देण्‍यात येतील. यामुळे त्‍यांची प्रबळ ओळख निर्माण होईल, जी त्‍यांना कॉर्पोरेट क्षेत्रामध्‍ये समावेशनासाठी सक्षम करेल. तसेच फेलोना त्‍यांची भावी ध्‍येये निर्धारित करण्‍यामध्‍ये देखील मदत करण्‍यात येईल आणि हा प्रोग्राम प्राइड सर्कलसोबत सहयोगाने इच्‍छुक फेलोना कॉर्पोरेट प्‍लेसमेण्‍ट्स देण्‍याचा प्रयत्‍न करण्यात येईल.