पावसाचा फटका… पार्ल्यात झाड कोसळलं, खासगी वाहनांचं नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
tree-collapse-on-car

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतल्या विलेपार्ले येथे साठे उद्यानाजवळच्या परिसरात उभ्या असलेल्या एका खासगी कार आणि रिक्षावर झाडाची मोठी फांदी कोसळली आहे. सोमवारी दुपारी 12:30 च्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळतात अग्निशमदलाचे जवान आणि महापालिकेच्या कर्मचारी दाखल झाले. दीड तासानंतर झाडाची फांदी बाजूला हटवण्यात त्यांना यश आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने झाडाची फांदी कोसळून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.