झाडांच्या पुनर्रोपणासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करणार – पालिका आयुक्त

271

‘मेट्रो-3’ प्रकल्पासाठी अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांचे एमएमआरसीएलमार्फत पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या झाडांचे अधिक नुकसान होऊ नये म्हणून ती मुळांसकट पुनर्रोपित करता येतील अशा यंत्रणेचा वापर केला जाणार असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या वतीने गुरुवारी कोर्टात देण्यात आली. प्रस्तावित ‘मेट्रो-3’च्या मार्गात अडथळा निर्माण करणारी झाडे कापण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मेट्रो प्रशासनाने केली आहे. याला पर्यावरणप्रेमींनी विरोध करत हायकोर्टात आव्हान दिले आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने नेमलेल्या न्यायमूर्ती  ए.ए. सय्यद यांच्या समितीपुढे गुरुवारी सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी पालिका प्रशासनाने कोर्टाला सांगितले की, लवकरच पालिका वृक्ष पुनर्रोपणासाठी उपयुक्त अशी यंत्रसामग्री विकत घेणार आहे. एवढेच काय तर एमएमआरसीएलला सर्व मदत केली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या