अतिउत्साही ट्रेकर्सना प्रोफेशनल ट्रेकर्सचे सोशल मीडियावरून मोलाचे सल्ले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
trekkers

सामना ऑनलाईन । ठाणे

सध्या ट्रेकिंगवर जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र ट्रेकिंगवेळी आवश्यक अशा नियमांकडे दुर्लक्ष करण्याने संकटात अडकणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. रविवारी पेब किल्ल्यावर ट्रेकसाठी गेलेले तरुणही अशाच प्रकारे अडकले होते. सुदैवाने त्यांना वाचवण्यात यश आले. मात्र त्यानंतर सोशल मीडियावरून हौशी ट्रेकर्सना प्रोफेशनल ट्रेकर्सनी मोलाचे सल्ले दिले आहेत.

रविवारी दिनांक 23 डिसेंबर 2018 रोजी घाटकोपरचे दोन तरुण ट्रेकिंगसाठी नेरळ येथील पेब किल्ल्यावर आले होते. पण रस्ता भरकटल्यामुळे चुकीच्या आणि अवघड जागी अडकून बसले. त्यातील एक जण जखमी पण झाला होता. त्यांनी त्यांच्या मित्रांना कॉल करून झालेला प्रकार सांगितलं. त्यांच्यातल्या एकाने महेश आंग्रे यांना कॉल केला. त्यांनी मिलिंद कर्ले यांच्याशी संपर्क करून माथेरान रेस्क्यू टीमच्या सुनील कोळी यांच्यापर्यंत ही माहिती पोहोेश आंग्रे यांना कॉल केला. त्यांनी मिलिंद कर्ले यांच्याशी संपर्क करून माथेरान रेस्क्यू टीमच्या सुनील कोळी यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली. सुनील कोळी यांनी सह्याद्री रेस्क्यू टीमला झालेला सगळं प्रकार सांगून त्या तरुणांना शोधायला पाठवलं. मिलिंद आणि सह्याद्री रेस्क्यू टीम निघाले त्या तरुणांना वाचवायला. बऱ्याच वेळाने त्या तरुणाचं लोकेशन ट्रेस झालं आणि त्यांच्या पर्यंत पोहोचले. मोठ्या प्रयत्नांनी त्या दोन तरुणांना जखमी अवस्थेत फणसवाडी मार्गे नेरळ येथील रुग्णालयात संध्याकाळी दाखल केले. मेडिकल चेकअप करून त्या तरुणांना ट्रेन मध्ये बसवून दिलं.

झालेल्या प्रकारात मिलिंद कर्ले आणि सह्याद्री रेस्क्यू टीम (संदीप कोळी, उमेश मोरे, अनिल ढोले, संतोष केळगने, महेश काळे ) या सगळ्यांनी दाखवलेल्या धाडसी प्रयत्नांना यश मिळाले. मात्र अशा घटना वाढल्या आहेत. अतिमहत्वाचे नियम न पाळल्यामुळे सर्व ट्रेकर्सवर बट्टा बसतो. त्यामुळे अशा चुका करू नका, अशी विनंती ट्रेकर्सकडून करण्यात येत आहे.

पूर्ण नियोजनाशिवाय ट्रेकला जाऊ नका!

मी सर्व हौशी ट्रेकर्स ना विनंती करतो की ट्रेकला जाताना काही महत्वाचे, अत्यावश्यक नियम पाळत जा. ट्रेकिंग म्हणजे पिकनिक नाही याचं भान ठेवा. पूर्ण नियोजनाशिवाय ट्रेकला जाऊ नका.

– महेश आंग्रे (ट्रेकर, अंबरनाथ)