आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहातून चार संगणक चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहातून चोरट्यांनी 80 हजार रूपये किमतीच्या चार संगणकासह एक टीव्ही चोरून नेला. ही घटना एप्रिल ते जून कालवधीत मांजरी स्टड फार्म परिसरातील वसतीगृहात घडली. याप्रकरणी संजीव तोगरे (वय 46 रा. मांजरी बुद्रूक) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मांजरी स्टड फार्म परिसरातील साईनाथ कॉलनीत आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह आहे. एप्रिल ते 3 जून कालावधीत वसतीगृह बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी वसतीगृहाच्या मागच्या दाराचे कुलूप तोडून आतमधील 4 संगणक आणि एक टीव्ही असा 80 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गाडेकर तपास करीत आहेत.