कोल्हापूरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेनेच्या पहिल्या शाखेत ताराबाई रोड येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरापर्यंत पोहचवा.तसेच शिवसेनेचा विस्तार गाव,वाड्या-वस्त्यापर्यंत करा असे आवाहन उदय सामंत यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे,खासदार धैर्यशील माने,माजी आमदार सुरेश साळोखे, सुजित चव्हाण,शिवाजी जाधव,मंजीत माने, अवधूत साळोखे,मेघना पेडणेकर,दीपा शिंदे आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.