
तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई-ठाण्यासह राज्यभरातील शिवसैनिकांनी आज माँसाहेबांना श्रद्धापूर्वक आदरांजली वाहिली. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांनी माँसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. माँसाहेबांच्या स्मारकासमोर फुलांची आरास करण्यात आली होती. अत्यंत भावपूर्ण वातावरणात सोशल डिस्टन्सिंग पाळत अत्यंत शिस्तीने माँ साहेबांना शिवसेना नेते व शिवसैनिकांनी पुष्पांजली अर्पण केली. शिवसेना नेते दिवाकर रावते, उपनेते खासदार अरविंद सावंत, उपनेते विजय कदम, भारतीय कामगार सेना अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, आमदार रवींद्र वायकर, वनमंत्री संजय राठोड, महापौर किशोरीताई पेडणेकर, आदी यावेळी उपस्थित होते.
स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे स्मारक समितीच्या वतीने शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, जी. एस. परब, शरद पवार, प्रवीण पंडित यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. माँसाहेबांच्या पुतळय़ाभोवती फुलांची सजावट स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या वतीने करण्यात आली. खासदार राहुल शेवाळे, अंबादास दानवे, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, आमदार नितीन देशमुख, आमदार यामिनी जाधव, माजी आमदार दगडू सकपाळ, माजी खासदार मोहन रावले, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, विभाग संघटक शशी फडते, उपविभागप्रमुख राकेश देशमुख, प्रकाश आचरेकर, राजू पाटणकर, अशोक केळकर, भारत म्हाडगूत, उपविभाग संघटिका वैशाली पाटणकर, राजेंद्र सूर्यवंशी, माजी महापौर श्रद्धा जाधव, महादेव देवळे, नगरसेवक रामदास कांबळे, ऊर्मिला पांचाळ, सिंधूताई मसूरकर, माजी नगरसेवक व युवासेना सहसचिव ऍड. मेराज शेख, रत्नागिरी जिल्हा समन्वयक शरद जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेंद्र भोसले, उपशाखाप्रमुख सागर पवार, प्रशांत जाधव, सदानंद जाधव, मंगेश मोरे, स्वप्नील माने, सिद्धार्थ जामसंडेकर, मंदार नार्वेकर, सुनील जाधव, फोटोग्राफर गौरव नरेंद्र भोसले, दिनकर पारधी, प्रदीप पवार, तुळशीदास देसाई, भास्कर परब, शिवम यादव, सुनील परब यांनी विशेष सहकार्य केले.
शाखाप्रमुख अजित कदम, रवींद्र गोरे, संजय म्हात्रे, गजानन पाटील, राजेश भोगले, संदीप देवळेकर, आनंद भोसले, संतोष कटके, महादेव शिंदे, चंदू झगडे, विधानसभा संघटक संजय नटे, भा.का. सेना उपाध्यक्ष अजित साळवी, राम साळगावकर, अरुण तोरस्कर, स्था.लो.स.चे सुनीता पाटील, उल्हास बिले, शिव वाहतूकचे अन्वर शेख, महाराष्ट्र वितरक सेनेचे मारुती साळुंखे, उदय दळवी, म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे रंजना नेवाळकर, राम लिंबारे, प्रभाकर भोगले, उपशाखाप्रमुख भटू अहिरे, पंढरीनाथ हसे, सुरेश काळे, अशोक नाईक, रवी राणे, प्रमोद म्हांबळे, भाऊ म्हात्रे, सुधीर हिंदळेकर, फेरीवाला संघटनेचे बाळा पवार, दीपेश पटवर्धन, विभाग संघटक कविता जाधव, माया जाधव, अनसूया कडू, रिमा पारकर, माधवी सावंत, आशा चारी, अंजना अहिरे, ज्येष्ठ शिवसैनिक माजी नगरसेवक विजयकुमार दळवी, मिलिंद जाधव, वर्षा मिलिंद जाधव, गुणवंत कामगार सूर्यकांत बिर्जे, जेट एअरवेजचे उदय गोखले, विधानसभा संघटिका वत्सला पाटील, शाखा संघटिका ममता भंडारी, छाया वाकसे, सुवर्णा सावंत, धनवंती सोनवडेकर, संगीता पडवण, ईश्वर वाकसे, विभाग संघटक राजुल पटेल इत्यादी उपस्थित होते.






























































