
आपल्या जीवाची बाजी लावत वांगणी रेल्वे स्थानकातील रुळावर पडलेल्या लहान मुलाचा जीव वाचवणाऱया पॉईंटमन मयूर शेळके याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मयूरच्या या धाडसाला सलाम करण्यासाठी नेरळच्या एका शेफने चक्क प्रुट कार्क्हिंग आर्टद्वारे त्याला मानवंदना दिली आहे. या कलाकाराने नुकतीच कलिंगडावर मयूरची प्रतिकृती साकारली असून ती सोशल मीडियाकर क्हायरल होत आहे.
वैभक भुंडेरे असे या कलाकाराचे नाव आहे. नेरळमधील पोशिर येथे राहणारा वैभक सध्या पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलात शेफ म्हणून काम करतो. आपली शेफची नोकरी सांभाळून त्याने आपली कला देखील जपली आहे. आतापर्यंत त्याने अनेक दिग्गजांच्या प्रतिकृती कलिंगडावर आणि पिंपळाच्या पानावर साकारल्या आहेत. नुकतीच त्याने आपल्या कलाकृतीमधून जिगरबाज मयूरला सलाम केला आहे. अवघ्या अर्ध्या तासात त्याने ही कलाकृती तयार केली आहे.
याबाबत वैभक म्हणाला, चिमुकल्याला वाचवण्यासाठी मयूरने जे काही केले त्याबद्दल त्याचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. खऱया आयुष्यातला तो सुपरहिरो ठरला आहे. त्याच्या धाडसाला माझ्या कलेतून सलाम करण्याचा मी छोटासा प्रयत्न केला आहे.


























































