त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव पाच हजार कुटुंबांना गायी गिफ्ट देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । आगरताळा 

कुपोषण संपवण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव पाच हजार कुटुबांना १० हजार गायी वाटणार आहेत. देव म्हणाले की, “आम्ही पाच हजार कुटुंबांच्या रोजगारासाठी ही योजना सुरू करत आहोत, सहा महिन्यानंतर त्यांना यातून त्यांना पैसे मिळण्यास सुरूवात होईल, या योजनेमुळे गरीबी आणि कुपोषणशी लढण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.

तसेच आपण मोठे उद्योग स्थापन करण्याच्या विरोधात नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु दोन हजार लोकांना रोजगार देण्यासाठी १० हजार कोटींची गुंतवणूक करण्याची गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले. देव म्हणाले की, “पाच हजार कुटुंबांबा १० हजार गायी दिल्यास सहा महिन्यात त्यांना पैसे मिळण्यास सुरूवात होईल.” लोकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आपणही मुख्यमंत्री निवासात गाय पाळणार अशी घोषणाही देव यांनी केली.