
सामना ऑनलाईन । आगरतळा
त्रिपुरातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने सरकारी अधिकाऱ्यांसाठी विचित्र फतवे जारी करायला सुरुवात केली आहे. अधिकाऱयांना डय़ुटीवर असताना जीन्स आणि गॉगल घालण्यास मनाई करणारा फतवा नुकताच काढण्यात आला. कार्यालयीन बैठकीवेळी मोबाईल फोनवर चॅटिंग करणेही अयोग्य असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
त्रिपुरा सरकारचे प्रधान सचिव सुशील कुमार यांनी एक जाहिरात प्रसिद्ध करून याची माहिती सर्वांना दिली आहे. शासकीय बैठकांच्या वेळी ड्रेस कोडचे सक्तीने पालन करण्याच्या सूचना त्यात दिल्या गेल्या आहेत. 20 ऑगस्ट रोजी हा ड्रेस कोड जाहीर करण्यात आला. जीन्सबरोबरच कार्गो पॅण्टलाही त्यात मनाई केली गेली आहे. काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने (सीपीएम) त्रिपुरा सरकारच्या या फतव्यांचा तीव्र निषेध केला आहे.
summary- tripura govt to ban jeans and goggle




























































