टीआरपी केसमध्ये वाझेने बार्ककडून 30 लाख घेतले, हवालामार्फत झाला पैशाचा व्यवहार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्फोटके आणि मनसुख हत्या प्रकरणात अटक केलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने टीआरपी प्रकरणात बार्पकडून 30 लाख रुपये हवालामार्फत घेतल्याचे अंमलबजावणी संचालनालया (ईडी)च्या तपासात समोर आले आहे. ईडीने नुकतेच बार्पच्या काही जणांचा जबाब नोंदवला आहे, तर टीआरपी प्रकरणात ईडी लवकरच आरोपपत्र सादर करणार आहे.

गेल्या वर्षी गुन्हे शाखेने टीआरपी प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. या केसचा तपास सुरू असतानाच सीआययूने बार्प (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल) हंसा कंपनीच्या  अधिकारी आणि कर्मचाऱयांना अटक केली होती. हवालामार्फत पैशाचा व्यवहार झाल्याचे तपासात समोर आल्यावर ईडीने तपास सुरू केला. या तपासादरम्यान ईडीने बार्पच्या अधिकाऱयाचा जबाब नोंदवला आहे. टीआरपी प्रकरणात बार्पने हवालामार्फत वाझेला पैसे दिल्याचे ईडी च्या तपासात समोर आले आहे.

टीआरपी मोजण्यासाठी बार्कने हंसा कंपनीला कंत्राट दिले होते. बॅरोमीटरची गोपनीय माहिती लीक करून काही चॅनल्सचा फायदा मिळवून दिल्याप्रकरणी बार्कने तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून सीआययूने तपास करून काही चॅनल्सच्या मालकांना आणि वरिष्ठ अधिकाऱयांना अटक केली होती. ईडी आता टीआरपी केसमध्ये लवकरच आरोपपत्र सादर करणार आहेत. नुकतेच ईडीने टीआरपी केसमध्ये फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा आणि महामूव्ही चॅनल्सची काही संपत्ती जप्त केली होती.