ब्रेकिंग – जोरदार भूकंपाने तुर्की हादरले, अनेक इमारती कोसळल्या; ग्रीसमध्ये त्सुनामी

तुर्की आणि ग्रीसला शुक्रवारी जोरदार भूकंपाचा झटका बसला. रिक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.0 मापण्यात आली. भूकंपानंतर तुर्कीत अनेक इमारती कोसळल्या असून ग्रीसमध्ये त्सुनामी आला आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपामुळे तुर्कीत इमारती कोसळल्या असून 6 जणांचा मृत्यू, तर 200 हुन अधिक लोक जखमी झाले आहेत. तुर्कीचे आरोग्य मंत्री फहार्टिन कोका यांनी यास दुजोरा दिला आहे.

भूकंपामुळे तुर्कीचे ग्रीस सीमेवरील शहर इजमिरमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. शहरात अनेक इमारती कोसळल्या, तर बहुतांश घरांना तडे गेले आहेत. आतापर्यंत 70 हुन अधिक नागरिकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत, असे इजमिरच्या राज्यपालांनी सांगितले.

तुर्कीचे मंत्री सुलेमान सोयलू यांनी भूकंपाबाबत ट्विट केले आहे. आतापर्यंत 6 इमारती कोसळल्याने वृत्त आहे. इजमिरसह बोर्नोवा आणि बेराकली शहरात देखील नुकसान झाल्याचे वृत्त आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दुसरीकडे तुर्कीचे पत्रकार मोहसिन मुगल यकानी 20 इमारती कोसळल्या असून 6 जणांचा मृत्यू, व 200 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

दरम्यान, भूकंपामुळे ग्रीसमध्ये हाहाकार उडाला आहे. या भागात मिनी त्सुनामी आल्याचे ग्रीसच्या प्रसारमाध्यमांनी सांगितले. भूकंपाचा केंद्रबिंदू ग्रीसच्या नोन कार्लोवसियन शहरापासून उत्तर-पूर्व भागात 14 किलोमीटर होता, असे अमेरिकेच्या भूगर्भ संशोधकांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या