बलात्काऱ्यासोबत लग्न करा, नव्या विधेयकावरून गोंधळ

2763
प्रातिनिथिक फोटो

बलात्कार करणारा नराधम जर पीडितेशी लग्न करण्यास तयार असेल तर त्याची शिक्षा माफ करण्याबाबतचे नवे विधेयक तुर्की देशाच्या संसदेत या महिनाअखेरपर्यंत सादर होणार आहे. या विधेयकावरून तुर्की देशात मोठा वाद निर्माण झाला असून त्यावरून तेथील नागरिकांनी सरकारविरोधात आंदोलन छेडले आहे.

आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘तुर्कीमध्ये ‘मॅरी युअर रेपिस्ट’ या नावाने हे विधेयक आणले जाणार आहे. या विधेयकाच्या विरोधात नाराज झालेले नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश असून त्यात सरकारी महिला अधिकारी देखील आहेत. ‘हे विधेयक मंजूर होऊन जर देशात तसा कायदा लागू झाला तर बालविवाह व बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तसेच गुन्हेगारांना कायद्याचा धाक न राहिल्याने लहान मुलांसोबत होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील वाढ होईल, असे आंदोलकांचे म्हणने आहे.

आपली प्रतिक्रिया द्या