Hina Khan : हिना खानची तब्येत बिघडली, श्वास घ्यायलाही होतोय त्रास

‘ये रिश्ता क्या केहेलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खानच्या तब्येतीबाबत माहिती समोर आली आहे. अभिनेत्री हिना खान हिची तब्येत बिघडली आहे. तिच्या श्वासही घेण्यास त्रास होत असल्याचे तिने इंस्टाग्राम स्टोरी  शेअर केली आहे. त्यामुळे तिचे चाहते काळजीत पडले असून लवकर बरे होण्याचे मेसेज करत आहेत.

हिना खान इंस्टाग्रामवर सतत सक्रिय असते. आपल्या चाहत्यांना फोटो, व्हिडीओ शेअर करत तिच्या आगामी प्रोजेक्टसबाबतही सांगत असते. हिनाने मंगळवारी रात्री उशिरा तोंडावर मास्क घातलेला फोटो शेअर केला. त्या फोटोतून तिला प्रकृती बरी नसल्याचे दिसत आहे. हिना खान सलग 16 तास शूटिंग करत आहे. तिला जेवायलाही धड वेळ मिळत नाही, त्यामुळे तिचा आहार बिघडला आहे. यासोबत हिना ने सांगितले की, मास्क लावून झोपावे लागते. ज्याने श्वास घ्यायला त्रास होतोय. तिला समजत नाहीय की, काय करावे. तिने तिच्याजवळ असलेली औषधेही दाखवली. यावेळी चाहत्यांनी लवकर बरे होण्याची प्रार्थना करणारे कमेंट केले आहेत.

हिना खानने राजन शाहीच्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून छोट्या पडद्यावर अभिनयाला सुरुवात केली. या शोमध्ये तिने ‘अक्षरा’ची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘कसौटी जिंदगी की 2’ मधील ‘कोमोलिका बसू’ हे पात्रही तिच्या लोकप्रिय पात्रांपैकी एक आहे.