छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीचे किडन्या निकामी झाल्याने निधन

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री लीना आचार्य हिचे दोन्ही किडन्या निकामी झाल्याने आज आज दिल्ली येथे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या तीसाव्या वर्षी लीनाने या जगाचा निरोप घेतला आहे.

लीना आचार्य हिने शेटजी, आपके आ जाने से, मेरी हानिकारक बीवी अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या मृत्यूने हिंदी मालिका सृष्टीला धक्का बसला आहे. ली ना हिने हिचकी या चित्रपटात राणी मुखर्जी सोबत काम केले आहे तसेच तिने अनेक वेबसीरीज मध्ये देखील काम केले होते.

लीना आचार्य ही गेल्या वर्षभरापासून किडनीचा त्रास होता. ती दोन्ही किडन्या निकामी झाल्यानंतर तीच्या आईने काही दिवसांपूर्वीच तिची एक किडनी तीला दिली होती. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या